रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात

डॉ. वंदना मुरकुटे यांची मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात
युरिया खत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - खतांच्या वाढीव किंमती कमी कराव्यात तसेच येत्या खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी मंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असून पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणार्‍या आर्थिक बाबींची जुळवणूक करण्यासाठी शेतकरी बांधव तयारीला लागला आहे, परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे, ही बाब शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे.

यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, कृषीमंत्री दादा भुसे, खा. सदाशिव लोखंडे व आ. लहू कानडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी कराव्यात तसेच येत्या खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे.

केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतू खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. तरी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खतांची ही दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. मुरकुटे यांनी पत्रात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com