मान्सूनपूर्वचा नगर शहराला तडाखा

उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना दिलासा
मान्सूनपूर्वचा नगर शहराला तडाखा

अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरासह उपनगरात सोमवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तासांहून अधिक झालेल्या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार पावसाने शहरात वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना दिलासा मिळाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला पासून एका तास जोरदार बरसला. यानंतर रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती.

भारतीय हवामान खात्याने नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवस वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधीक प्रमाणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. वादळी वार्‍यामुळे होणार्‍या पावसाने नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर नगरकर उकाड्याने हैराण झाले होते. दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी साडेचारनंतर वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. नगर शहरासह केडगाव, सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, भिंगार परिसरात एक तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.

दरम्यान, शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, अप्प चौक, निलक्रांती चौक, कापड बाजार, एमजी रोड, नवीपेठ चौक, तेलीखंट, नेता सुभाष चौक, नालेगाव रोड यासह अन्य सखल भागात पहिल्याच पावसात रस्त्यावर पाण्याचे तळे झाले होते. दरवर्षी जोरदार पावसात या भागात पाणी साचत असून मनपाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे यापूर्वीही दिसून आलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com