मराठी शाळांचा विद्यार्थी टक्का घसरतोय

राज्यात इंग्रजी माध्यमात 30 टक्के विद्यार्थी
मराठी शाळांचा विद्यार्थी टक्का घसरतोय

संगमनेर | Sangmner| संदीप वाकचौरे

राज्याची मराठी भाषा (Marathi language of the state) मातृभाषा असली, तरी राज्यातील सुमारे तीस टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निवड (Selection of English medium schools) केली आहे. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अवधे 64 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून, शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाण अवघे पंचवीस टक्के इतकेच राहिले आहे. केंद्रीय युडायस प्लसचा अहवाल (Report of the Central udayas Plus) नुकताच जाहिर करण्यात आला आहे. सध्याची आकडेवारी पाहाता मराठी माध्यमांच्या शाळा (Marathi medium schools) आणि शासकीय शाळांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

राज्यात एकूण पहिली ते बारावीसाठी दोन कोटी एकवीस लाख चौर्‍याहत्तर हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी शिकत आहे. त्यापैकी मराठी माध्यमासाठी 1 कोटी एक्केचाळीस लाख चौपन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण 63.83 इतके आहे. इंग्रजी माध्यमातून 60 लाख पंच्यान्नव हजार दोनशे सत्तावीस विद्यार्थी शिकत असून शेकडा प्रमाण 28 टक्के इतके आहे. उर्वरीत आठ माध्यमातून 19 लाख 24 हजार 650 शिक्षण घेणारे विद्यार्थी असून हे प्रमाण 8.67 टक्के इतके आहे.

राज्यात शासकीय शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थ्याचे प्रमाण (Proportion of students studying in government schools in the state) लक्षात घेता एकूण विद्यार्थ्यांपैकी 55 लाख 42 हजार 622 विद्यार्थी शिकत आहे. त्यातील 47 लाख 78 हजार 479 विद्यार्थी मराठी माध्यमात शिकत आहे. (Learning in Marathi medium) तर 2 लाख 19 हजार 343 विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहे (Learning in English medium). उर्दू माध्यमात (Urdu medium) 3लाख 83 हजार 224 विद्यार्थी शिकत आहे. खाजगी अनुदानित शाळेत (privately funded school) एक कोटी 4 लाख सोळा हजार एकशे सत्यांऐंशी विद्यार्थी शिकत आहे. हे शेकडा प्रमाण 46.97 टक्के इतके आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये 60 लाख 87 हजार 33 विद्यार्थी शिकत आहे.हे प्रमाण 27.45 टक्के इतके आहे. राज्यात तेलगू माध्यमात 2819 विद्यार्थी शिकत आहेत. तामिळी माध्यमात 4225 विद्यार्थी, सिंधी माध्यमात 3 हजार 514, कन्नड माध्यमातून 39464, गुजराथी 57706, बंगाली 4396, हिंदी 5 लाख 09 हजार 045 विद्यार्थी शिकत आहे.

राज्यात दीडशेपेक्षा अधिक पटाच्या अवघ्या 38 हजार शाळा

राज्यात पहिली ते बारावीच्या एक लाख दहा हजार 229 शाळा आस्तित्वात आहेत. त्यापैकी 65 हजार 886 शासकीय, 23791 खाजगी अनुदानित, 19654 विना अनुदानित शाळा आहेत. त्यापैकी दहा पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या 4746 शासकिय, 95 अनुदानित आणि 504 विनाअनुदानित शाळा आहे. 11 ते 20 पटाच्या 9348 शाळा शासकीय, 141 खाजगी अनुदानित, 627 विना अनुदानित शाळांचा समावेश आहे. 150 पेक्षा अधिक पट असलेल्या शाळांचे प्रमाण शासकीय शाळा 10740 इतके आहे. 17062 खाजगी अनुदानित, 10095 शाळा विना अनुदानित आहेत. पहिली ते बारावीच्या एकूण शाळांमध्ये अवघे पस्तीस टक्के शाळा या दिडशे पटापेक्षा अधिक आहेत.

सुमारे 900 शाळांना मान्यता नाही

राज्यात शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आल्यानंतर मान्यतेनंतर शाळा सुरू करता येईल असे म्हटले होते, मात्र असे असले तरी राज्यात एकूण अस्तित्वात असलेल्या शाळांपैकी 898 शाळा मान्यता प्राप्त नाहीत. त्यातील 285 शाळा दिडशे पेक्षा अधिक पटाच्या आहेत. वीसपेक्षा कमी पट असलेल्या 78 शाळा आहेत. तीस ते साठ पटाच्या 228 शाळा आस्तित्वात आहेत. या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मान्यता नसताना देखील शिकत आहेत.

मराठी माध्यमांतील पट घसरतोय..

राज्यात गेले काही वर्ष मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा पट कमी होत असल्याची चर्चा होत आहे. सध्या राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होत आहे. एक लाख दहा हजार शाळांपैकी 68 हजार शाळा सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. म्हणजे पासष्ट टक्के वाटा या शाळांचा आहे. मराठी माध्यमांच्या 61686, इंग्रजी माध्यमाच्या 387 शाळा, उर्दू माध्यमाच्या 2707 शाळा आहेत. उर्वरीत माध्यमांच्या सुमारे अकराशे शाळा असून या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे 25 टक्के इतके आहे. सरकारी बहुतांश शाळा या मराठी माध्यमांच्या आहेत. राज्यात 28 टक्के विद्यार्थी प्राथमिक पासून इंग्रजी माध्यमात प्रवेशित झाले असतील तर येत्या काळात मराठी माध्यमांच्या शाळांसमोर प्रश्न निर्माण होण्याचा धोका मानला जात आहे. त्यातच राज्यात वीस पटाच्या आतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास साडे पंधरा हजार शाळांना फटका बसू शकतो.या शाळांवरती काम करणारे सुमारे 31 हजार शिक्षक असू शकणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com