नेवासा तालुक्यातील रूग्ण संख्या ४८३ वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील रूग्ण संख्या ४८३ वर

आज आढळले २१ नवीन रुग्ण

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा तालुक्यात शनिवार १५ ऑगस्ट रोजी नव्याने २१ करोना Corona बाधीत रुग्ण आढळले असल्याचे माहिती तहसीलदार रुपेश सुराणा Rupesh Surana यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४८३ इतकी झाली आहे.

शुक्रवारी नेवासा येथील Covid Care Center मध्ये १२६ व्यक्तींच्या Rapid Antigen Test करण्यात आल्या. यामध्ये २१ व्यक्ती करोना बाधीत आढळून आले असून यात नेवासा शहरातील २, नेवासा बुद्रुक येथील १, उस्थळ दुमाला येथील १, नारायणवाडी येथील ४, देवसडे येथील ५, खडका येथील ८ व्यक्ती करोना बाधीत आढळून आले तर १०५ व्यक्तींचा अहवाल Negative आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ४८३ वर गेली आहे. २२ व्यक्तींना Discharge दिल्याने ३३६ कोरोनामुक्त झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com