नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ३४० वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ३४० वर

आज ८७ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

येथील कोविड केअर सेंटरमध्ये आज केलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात शहरातील व्यक्तीसह तालुक्यातील १६ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.

आज नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ८७ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामध्ये नेवासा शहरातील १०, घोडेगाव - २, उस्थळ दुमाळा, शिंगणापूर, नारायणवाडी, सोनई येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ७१ व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहे.

तालुक्यातील रुग्ण संख्या ३४० वर गेली आहे. ६ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने २३३ रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. आठ करोना बाधीत व्यक्तींचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

चांदयात आणखी एक बाधीत; संख्या आठ वर

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथे रुग्णाची संख्या वाढू लागल्याचे चित्र असून आज आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण रुग्णसंख्या आठ झाली आहे.

येथील साधारण तीस वर्ष वयाचा युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर युवक काही दिवसापुर्वी नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याची कोरोना टेस्टचा अहवाल आज आला असून तो बाधीत आढळुन आल्याचे चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ रजनिकांत पुंड यांनी सांगितले आहे. सदर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरु केले असून गावात नागरीकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, करोनाला घाबरू नका पण स्वतःची काळजी घ्या असे आवाहन डॉ पुंड यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com