नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ३२३ वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ३२३ वर

आज ८० व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्यात.

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील सहा गावांमधील १८ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.

दरम्यान नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ८० व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये नेवासा शहरातील बारा, सलाबतपूर येथील दोन तर निंभारी, उस्थळ दुमाला, सोनई, खेडलेकाजळी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ६२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली. दरम्यान आज १७ जणांना डिस्चार्ज दिल्याने २२५ व्यक्ती करोनामुक्त मुक्त झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com