नेवासा तालुक्यातील करोना बाधितांची संख्या २३९ वर

१२८ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या
नेवासा तालुक्यातील करोना बाधितांची संख्या २३९ वर

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये शनिवारी रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील आठ गावांमधील २० व्यक्ती करोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.

दरम्यान नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे १२८ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये नेवासा शहरातील सात, सुरेगाव येथील दोन, जैनपूर येथील तीन, पाचेगाव येथील दोन, रस्तापुर येथील दोन, निपाणी निमगाव येथील दोन, तसेच देवगाव व तरवडी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १०८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली.

दरम्यान शुक्रवारी २१९ रुग्ण संख्या होती त्यामध्ये २० रुग्ण वाढले असून आता तालुक्यातील रुग्ण संख्या २३९ वर गेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com