अकोले तालुक्यातील रुग्ण संख्या ३५८ वर
सार्वमत

अकोले तालुक्यातील रुग्ण संख्या ३५८ वर

तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूचा दर २.५१ टक्के

Nilesh Jadhav

अकोले प्रतिनिधी

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज ०७ व्यक्ती करोना बाधित आढळले आहेत. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३५८ झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये लहीत ०३, इंदोरी ०२, चास ०१, कोतुळ ०१ असे सात व्यक्ती करोना बाधितआढळून आले आहेत. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३५८ झाली असून २४५ व्यक्ती करोनामुक्त झाले आहे. तर ०९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४७ व्यक्ती खानापुर कोविड सेंटर येथे तर ५७ व्यक्ती खासगी रूग्णालयात व जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूचा दर २.५१ टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण ७०.२० टक्के आहे.

आज शुक्रवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या ४५ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधील अहवालात तालुक्यातील लहीत येथील ७३ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महीला, इंदोरी येथील ४५ वर्षीय महीला, २२ वर्षीय महीला, चास येथील २५ वर्षीय पुरुष, कोतुळ येथील १८ वर्षीय युवती अशा सात व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com