नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या २६१ वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या २६१ वर

कोविड केअर सेंटर येथे ५३ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रॅपिड अँटिजेन टेस्ट व खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालात शहरातील नऊ व्यक्तीसह बारा रुग्ण करोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.

आज नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ५३ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये नेवासा शहरातील नऊ व नेवासा बुद्रुक येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असुन खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या टेस्ट मध्ये माळीचिंचोरे व मांडेगव्हान येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली आहे. मंगळवारी पाच वाजेपर्यंत २४९ रुग्ण संख्या होती त्यामध्ये १२ रुग्ण वाढले असून आता तालुक्यातील रुग्ण संख्या २६१ वर गेली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com