सुपा गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची गरज

नागरिकांसह व्यावसायिकांची मागणी
सुपा गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची गरज

सुपा (वार्ताहर) - जिल्ह्यात नगर-पुणे महामार्गालगत सुपा ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहसत निर्माण होवून पाहत आहे. यासह पारनेर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व मोठी लोकवस्ती असलेले गाव असून या ठिकाणी अवघ्या दोनच राष्ट्रीयकृत बँका आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करतांना अडचणी येत असून जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी आणखी राष्ट्रीय बँकांना आपल्या शाखा सुरू करण्यास प्रवृत्त करावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर आसलेल्या सुपा शहर आहे. या ठिकाणी सध्या दोन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा असून एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. तर तीन इतर बँकाच्य शाखा आहेत. तसेच दहा ते पंधरा पतसंस्थाच्या शाखा आहेत. पतसंस्थाची संख्या मोठी असली तरी त्यांना मर्यादा पडत आहेत. तर सुपा परिसराची दैनदिन आर्थिक उलाढाल पाहता गावात राष्ट्रीकृत संस्थाची संख्या अपुरी पडत आहे. शहरालगत सुरवातीला हंगा, वाघुडे व सुपा शिवारात पहिली औद्योगिक वसाहत उभी राहीली.

दळणवळणाच्या सोईमुळे पुणे-मुंबईचा थेट संपर्क, मुबलक पाणी, वीज यामुळे आतंरराष्ट्रीय उद्योजक सुप्याकडे आकर्षीत झाले. त्यामुळे सुपा टोल नाक्याजवळ जपानी पार्क म्हणून दुसरी आंतरराष्ट्रीय औद्योगिक वसाहत उभी राहीली. ती पुर्ण झाल्यावर सुपा, हंगा गावच्या शिवारात शहाजापुरच्या बाजुने औद्योगिक वसाहत फेज तीन आकार घेत आहे. त्यामुळे सुप्यात मोठे उद्योग येत आहेत.

कामगार वाढत आहेत. रहिवाशी नागरिक वाढत आसल्याने आर्थिक उलाढाळ्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्याने या दोन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखांनी कामाचा मोठा ताण वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती, द्विव्यांग, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध शासकीय योजनांचे अनुदान, कृषी योजना, शेतीकर्ज, अन्य व्यवसायिक यांचे दैनदिन उलाढाल यांचे काम सध्या या ठिकाणी असणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांमधून होत आहे. यामुळे या दोन बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने सुपा गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या शाखा सुरू केल्यास त्यांचा फायदा गावातील नागरिकांसह संबंधीत बँकांनाही होणार आहे.

सुपा परिसरात असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत महामार्गावरील गाव व तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने गावाची वाढ व विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे सद्यस्थित असलेल्या बँकांच्या शाखावर मोठा ताण येत असून ग्राहकांनाही ताटकळत राहवे लागत आहे. गावात आणखी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाची नितांत गरज आहे.

- सचिन भास्कर पवार, संचालक सफलता उद्योग समूह, सुपा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com