'भारताला पाणीदार बनविण्यासाठी जनसामुदायाने चालविलेल्या विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज'

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांचा सल्ला
'भारताला पाणीदार बनविण्यासाठी जनसामुदायाने चालविलेल्या विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज'

अहमदनगर/सुखदेव फुलारी

भारतातील 17 राज्य व 365 जिल्हे पाणीटंचाई व दुष्काळाचा तर 190 जिल्हे पूरक्षेत्र परिस्थितीचा सामना करत आहेत असून जमिनीखालील जलधर (Aquifer) 72 टक्के अतिशोषित (Over Draft) आहे. भारताला पाणीदार बनवायचे असेल तर समुदायाने चालविलेल्या विकेंद्रित जल व्यवस्थापनाची (Community Driven Decentralized Water Management) चळवळ उभारली पाहिजे असा सल्ला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी दिला.

अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि उन्नत भारत अभियान यांचे पुढाकाराने आयोजित "ज्ञानाचे प्रतीक" (Symbol of knowledge) या ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह बोलत होते. अखिल भारतीय शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव छत्रपती मालोजीराजे भोसले, डॉ.सुमंत पांडे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई,सहसचिव,श्री.शिंदे, प्राचार्य डी. एस.डॉ.बोरमणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.एन. एस.शेजवळ व सुमारे 900 विद्यार्थी यावेळी ऑनलाइन उपस्थित होते.

'भारताला पाणीदार बनविण्यासाठी जनसामुदायाने चालविलेल्या विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज'
निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार

डॉ.राजेंद्र सिंग पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती पासून प्रकृती वेगळी झाल्याने आपल्या भविष्यावर संकटे येत आहेत. परंतु संकटांना भिऊन आपण स्वस्थ राहू शकत नाही तर प्रकृती व पर्यावरणाचे रक्षण करत पुढे जायचे आहे. पंचमहाभूत आपल्याला बनविणारे आणि चालविणारे पाच घटक आहेत.हेच आपले नारायण व भगवान आहे. आपले आरोग्य, अन्न व पाणी नदीशी जोडलेले आहे. वाहत्या नद्या आणि शरीरातील रक्त वाहिन्या सारख्या आहेत. त्यांची काळजी घेऊन नद्यांचे होणारे प्रदूषण रोखले पाहिजे. आस्था, पर्यावरण, संस्कृती जेव्हा हळू हळू अस्ताला जाते त्यावेळी सगळ्यात जास्त हानी पर्यावरणाची हानी होते. आज देशातील नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत, अतिक्रमण हे एक दुसरे मोठे अरिष्ट आहे. हे शतक खूप आव्हानाचे आहे, तथापि हतबल न होता जलसाक्षर होणे हाच यावरील उपाय आहे. जेंव्हा जनसमुदयाव्दारे विकेंद्रित जल व्यवस्थापन होते तेंव्हा गावे पाणीदार होऊन दुष्काळ, पूर मुक्त होतात.

आजचे आपले आधुनिक शिक्षण मुलांना निर्सगाकडून जास्तीत जास्त घेण्याचे व प्रकृतीचे पोषण करण्या ऐवजी शोषण करण्याचे शिक्षण देत आहेत,तथापि निसर्ग आणि मानवतेचे पोषण करणारे शिक्षणाची आज नितांत गरज आहे. भारताला पाणीदार बनविण्यासाठी सायन्स, इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी या तीन विभागांनी एकत्रितपणाने काम करण्याची गरज आहे. पाणी म्हणजे हवामान आणि हवामान म्हणजे पाणी (Warer is Climate and Climate is Water) हे घोषवाक्य घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. युवकांनी स्थानिक समस्या समजून घेऊन त्याचा अभ्यास करावा आणि कृतिशील राहावे असे आवाहन ही डॉ.राजेंद्र सिंह यांनी केले.निशा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com