सरल पोर्टलवरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांची नावे परस्पर गायब

राज्यभरातील प्रकार : शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचा प्रताप असल्याचा मेस्टाचा आरोप
सरल पोर्टलवरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांची नावे परस्पर गायब

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील बर्‍याच इंग्रजी शाळांमध्ये शिकत असलेली मुलांची नावे आपोआप इंग्रजी शाळांच्या सरल पोर्टलवरून गायब झालेली आहेत.

हा प्रकार शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनीनी इंग्रजी शाळांवर केलेला नियमबाह्य सायबर हल्लाच असल्याचा आरोप मेस्टाचे (इंग्रजी माध्यम शाळा संघटना) अध्यक्ष देवीदास गोडसे यांनी केला आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या 9 हजार शाळांमध्ये प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळामधील विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेवर शिक्षक मान्यता व शाळा अनुदान अवलंबून आहे. 30 सप्टेंबरपुर्वी बर्‍याच अनुदानित मराठी शाळांनी व जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या मुलांची घाई-घाईने फक्त तोंडी माहिती संकलीत करून संबंधीत विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे इंग्रजी शाळांना ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवल्या. मात्र, त्यातील काही पालक आणि मुलांना इंग्रजी शाळेतच शिकायची इच्छता असताना, त्यांच्यासह काही पालकांना इंग्रजी शाळांची फी बुडवुन संबंधीत मुले इंग्रजी शाळा सोडून अन्य शाळेत दाखल केली असल्याने त्या सरल पोर्टल वरील ट्रान्सफर रिक्वेस्ट इंग्रजी शाळांनी स्विकारल्या नाहीत. त्यामुळे त्या पेंडिग ट्रान्सफर रिक्वेस्ट संबंधीत तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लाँगिनला गेल्या. त्याठिकाणी त्यांनी ट्रान्सफर रिक्वेस्टला मान्यता दिली. वास्तवात हे करण्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी यांनी इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी खुलासा विचारणे आवश्यक होते. मात्र, तो न मागवता कोणत्या नियमानूसार त्यांना मान्यता हे बोध होत नसल्याचे मेस्टाचे अध्यक्ष गोडसे यांचे म्हणणे आहे.

इंग्रजी शाळांमधील पालक शिक्षक संघाच्या ठरावात नमुद फी बुडवुन गेलेल्या पालकांची मुले व काही पालकांची इच्छा नसताना सुद्धा ती मुले आपोआप इंग्रजी शाळांच्या सरल पोर्टल वरुण गायब झालेली आहे, ही बाब गंभीर आहे. याबाबत लवकर संबंधीत गटशिक्षणाधिकारी यांना विचारणा करण्यात येणार असून विहित प्रक्रियेनुसार गटशिक्षणाधिकारी यांनी ट्रान्सफर रिक्वेस्टला परस्पर मान्यता दिली असून हा इंग्रजी शाळांवर अन्याय आहे.

या विरोधात मेस्टा न्यायालयात दाद मागणार आहे. पालकांनी पालक शिक्षक संघाच्या बैठकीत झालेल्या ठरावानूसार शाळेची फी अदा करणे आवश्यक आहे. मात्र, ती बूडवून दुसर्‍या शाळेत प्रवेश घेतले व त्या शाळेने रिक्वेस्ट विहित प्रकियेचा अवलंब न करता फी थकित विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट मान्य केल्याने इंग्रजी शाळांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.