डोक्यात दगड घालून एकाची हत्या

नगरमधील घटना, एक संशयित ताब्यात
डोक्यात दगड घालून एकाची हत्या

अहमदनगर - डोक्यात दगड घालून एकाचा खून केल्याची घटना नेप्ती नाका येथे बुधवारी सायंकाळी घडली. दिलीप देवराम विरदकर (रा. ठाणगे मळा, नालेगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, डोक्यात दगड घालणार्‍या एका संशयीत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

याबाबत पोलिसांंनी दिलेली माहिती अशी की, दिलीप विरदकर यांचे काही इसमांसोबत बुधवारी सकाळी किरकोळ वाद झाले होते. या वादानंतर सायंकाळी नेप्ती नाका येथे दिलीप यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती कोतवाली, तोफखाना पोलिसांना मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे. दरम्यान भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी डोक्यात दगड घालून हत्या होत असेल तर कायद्याचा धाक राहिला का नाही अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com