करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी घेतली बालरोग तज्ज्ञांची बैठक

पालकांनी घाबरून न जाता बालकांची काळजी घ्यावी - शंकर गोरे
करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी घेतली बालरोग तज्ज्ञांची बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेमध्ये बालकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून शहरांमध्ये बालकांसाठी ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांची कमिटी नेमणार असून त्यांचे करोना तिसर्‍या लाटेत सहकार्य घेतले जाणार आहे. पालकांनी आपल्या बालकांची काळजी घ्यावी, तसेच घाबरू नये, असे आवाहन आयुक्त शंकर गोरे यांनी केले.

करोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त शंकर गोरे, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, सदस्य निखिल वारे, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक आप्पा नळकांडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. पियुष खंडेलवाल, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ.श्याम तारडे, डॉ. मकरंद धर्मा, डॉ. गौरव मचाले, डॉ.नानासाहेब अकोलकर तसेच आदी बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.

यावेळी आयुक्त गोरे म्हणाले, करोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने पूर्ण क्षमतेने उपाययोजना केल्या आहेत. करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये सर्वांच्या सहकार्‍यातून व उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते करोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेमध्ये बालकांवर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी बालरोग तज्ञांची कमिटी नेमणार असून त्यांच्या सहकार्‍यातून बाधित बालकांवर उपचार करण्यात येणार आहेत.

बोलताना नगरसेवक डॉ. बोरुडे म्हणाले, मनपा आरोग्य समितीच्यावतीने बालरोग तज्ज्ञ यांची बैठक घेण्याच्या सूचना आरोग्य समितीच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली असे त्यांनी सांगितले, तिसर्‍या लाट साठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे. आपण नक्कीच ही तिसरी लाट परतून लावून असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com