मुळा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

मुळा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

राहुरी | Rahuri

मुळा धरणक्षेत्रात (mula dam) सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने (heavy rain) धरणातून मुळानदीत सोडणार येणारा विसर्ग (water discharge) आज सकाळी वाढवून ६ हजार १५० क्‍युसेकने होता, तो विसर्ग सकाळी ८ वाजता ८ हजार ६८० क्युसेक करण्यात आला आहे.

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग व प्रशासनाने केला आहे. राहुरी शहरासह परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मल्हारवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. राहुरी शहरात ४० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

Related Stories

No stories found.