केवळ मांसाहार केल्याने प्रतिकारक्षमता वाढते हा गैरसमज - डॉ. गायके

केवळ मांसाहार केल्याने प्रतिकारक्षमता वाढते हा गैरसमज - डॉ. गायके

राहुरी (प्रतिनिधी) - केवळ मांसाहार केल्याने प्रतिकारक्षमता वाढते हा गैरसमज आहे. निव्वळ मांसाहारांचे प्रमाण जास्त असणार्‍या देशात करोना संसर्गाचे प्रमाण व करोना मृत्यूची संख्या जास्त आहे, असे डॉ. महेश गायके यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा येथील अण्णासाहेब पाटील कदम प्रतिष्ठानच्या वतीने करोना संदर्भात पाच दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यातील द्वितीय पुष्प गुंफताना करोना झाल्यावर घ्यावयाची काळजी, हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

डॉ. गायके म्हणाले, गरम पाणी पिणे, किंवा गरम पाण्याची वाफ घेतली पाहिजे. मांसाहार केल्याने प्रतिकारक्षमता वाढेल हा गैरसमज आहे. कफ, पित्त वाढणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. दिवसातून कमीतकमी चार ते पाचवेळा गरम पाणी पिले पाहिजे. प्राथमिक लक्षणे आढळताच त्याबाबत त्वरित डॉक्टरांकडे योग्य त्या तपासण्या केल्या पाहिजेत. करोनाच्या भितीमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच सकारात्मक विचार हे या लढाईत महत्त्वाचा भाग आहे.

नेवासा येथील डॉ.प्रणव जोशी यांनी करोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, या विषयावर पहिले पुष्प गुंफले. प्रतिष्ठानचे कार्यवाह शिवाजी उदावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महेश शेळके यांनी आभार मानले.दुपारी एक वाजता ही व्याख्याने सुरु होत असून अजून चार व्याख्याने होणार आहेत.

शनिवार दि.15 मे रोजी करोना उपचार, समज-गैरसमज या विषयावर वक्ते डॉ. सूर्यकिरण वाघ, कोल्हापूर, रविवार दि.16 मे रोजी करोना काळातील सामाजिक दायित्व व समाजभान यावर वक्ते डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे प्रांत कार्यवाह, पश्‍चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेत डिजिटली सहभागी व्हावे , असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भवानराव थोरात, शिवाजी उदावंत (सहकार्यवाह), समन्वयक महेश शेळके यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com