अकोलेत कांदा @1401

अकोलेत कांदा @1401
कांदा उत्पादक

अकोले (प्रतिनिधी) -

अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 06 मे 2021 रोजी कांदा 4608 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1401 रुपये बाजारभाव मिळाला आहे.

नंबर 1 - 1201 ते 1401 रुपये, नंबर 2 - 951 ते 1200 रुपये, नंबर 3- 801 ते 950रुपये, गोल्टी - 650 ते 1000 रुपये, खाद 200 ते 500 रुपये प्रमाणे बाजार भाव मिळाले. अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 11 ते 4 व लिलावाच्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवूण निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीचे आवारात आणावा.

बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com