स्वस्तात सोन्याच्या अमिषाने दरोडा

जिल्ह्यात कुठे घडली घटना?
स्वस्तात सोन्याच्या अमिषाने दरोडा

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmedagar

स्वस्तात सोने देण्याचे अमिष (The lure of cheap gold) दाखवुन दोघा भावांना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण (Brothers Beating) करत त्यांच्याकडील रोख रक्कम (Cash), सोन्याचे दागिणे (Gold jewelry), मोबाईल व घड्याळ असा आठ लाख 34 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. नगर तालुक्यातील सारोळा कासार (Sarola Kasar) शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी संदीप धागे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व इतर आठ ते 10 इसमांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल (Filed a robbery charge) करण्यात आला आहे. लुटमार झालेले मिलीद कान्हाजी काशीदे (वय 36 रा. बल्लारपुर ता. जि. चंद्रपुर, हल्ली रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

संदीप धागे याने मिलीद काशीदे व त्यांच्या भावाला स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून काशीदे बंधू मंगळवारी (दि. 20) सायंकाळी पाच वाजता नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात आले. त्याठिकाणी आधीच आठ ते 10 जण होते. त्यांनी काशीदे यांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, विविध कंपन्यांचे मोबाईल व घड्याळ असा आठ लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला. काशीदे यांनी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com