बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून माळीचिंचोरे येथील 18 जणांच्या फसवणुकीचा  प्रयत्न

बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून माळीचिंचोरे येथील 18 जणांच्या फसवणुकीचा प्रयत्न

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

एका बँकेचे नाव सांगून तुम्हाला सबसिडी असलेले कर्ज मंजूर झाले आहे असे सांगून 18 लोकांकडून पैशाची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका भामट्यास माळीचिंचोरे येथील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बापू दादासाहेब मंडलिक रा. माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 25 सप्टेंबर रोजी एजाज चाँद शेख रा. बोधेगाव ता. शेवगाव हा आमचे घरी आला. त्याने मी आयडीएफसी बँकेच्या पैठण शाखेकडून आलो असल्याचे सांगून तुम्हाला दोन लाखाचे सबसिडी असलेले कर्ज मंजूर करुन देतो असे म्हणून त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक आदींच्या झेरॉक्स प्रती घेऊन निघून गेला.

त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी तो परत आला व कर्ज मंजूर झाले असून त्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये द्या अशी मागणी माझ्याशिवाय पुढील 17 जणांकडे केली. अशोक नामदेव भोजणे, संतोष दादासाहेब मंडलीक, प्रकाश दादासाहेब मंडलीक, संतोष विठ्ठल पुंड, सुंदर घमाजी घोरपडे, समीर अकबर सय्यद, झुंबर घमाजी घोरपडे, अमोल सुंदर घोरपडे, शिवाजी गोरख मंडलीक, राजू बाबुराव देव्हारे, प्रकाश शाम राक्षे, सतीश हरिभाऊ मोरे, बाळासाहेब नारायण शेंडे, राहुल बाळासाहेब आहिरे, वैभव राजू देव्हारे, संजू पंढरीनाथ वाघमारे व विक्रम संजय लोखंडे. या फिर्यादीवरुन एजाज चाँद शेख रा. बोधेगाव ता. शेवगाव याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.