वाघुरीत घुसून बिबट्याने मेंढी केली ठार

वाघुरीत घुसून बिबट्याने मेंढी केली ठार

मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण

संगमनेर | तालुका प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे बिबट्याने वाघुरीत घुसून मेंढी ठार केली आहे. ही घटना शनिवार दिनांक २४ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली आहे.

याबाबत माहिती अशी की साकूर येथील लहाणू सावित्रा खेमनर हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी जांबुत बुद्रुक येथे घेवून आले होते. दिवसभर मेंढ्या चारून झाल्या नंतर संध्याकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरीत बंद केल्या होत्या. मात्र वाघुरी पासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट वाघुरीत घुसून मेंढीवर हल्ला केला. त्यामुळे मेंढी ठार झाली आहे.

रविवारी सकाळी वनसेवक रोहिदास भोईटे, बाळासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी जावून त्या मृत मेंढीचा पंचनामा केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिंबट्यांचे हल्ले बंद झाले होते. मात्र आता पुन्हा हल्ले होवू लागल्याने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com