
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
चार लाख रूपयांच्या व्याजाच्या बदल्यात 60 लाख रूपयांचे प्लॉट व घर सावकाराने आपल्या नावावर करत लुबाडल्याचा प्रकार कर्जत येथे घडला. कर्जत पोलसांनी सावकारावर कारवाई करत घर व प्लॉट पुन्हा पिडीतास मिळवून दिला
याबाबत अजय राजाबापु लांडघुले (रा. बुवासाहेबनगर, कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी खासगी सावकार याच्याकडून 2014 साली 4 रुपये शेकडा व्याजदराने 4 लाखांची रक्कम घेतली होती. त्याबदल्यात फिर्यादीकडून सावकाराने प्लॉट व नंतर राहते घरही बळजबरीने लिहून घेतले.
लांडघुले यांनी सावकाराचे सर्व पैसे परत केले. तरी सबंधीत प्लॉट परत देत नव्हता. अखेर अजय लांडघुले यांनी सर्व हकीगत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगितली. यादव यांनी कारवाईचा बडगा उचलताच सावकाराने आपल्या ताब्यात घेतलेली जमीन व घर आता तक्रारदाराला परत केले.