श्रीगोंदा तालुक्यातील जमीन व हवामान डाळिंब पिकासाठी अनुकूल

श्रीगोंदा तालुक्यातील जमीन व हवामान डाळिंब पिकासाठी अनुकूल

श्रीगोंदा | प्रतिनिधी

देश विदेशात अनेक ठिकाणी डाळिंब पीक घेतले जाते ,आपल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा विक्रमी उत्पादन घेतले जाते,श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंबाचे वाढते क्षेत्र ग्रामीण अर्थकारणास चालना देणारे ठरत असून येथील जमीन हवामान डाळिंब लागवडी साठी अनुकूल आहे असे मत प्रसिद्ध डाळिंब तज्ञ डॉ बी टी गोरे यांनी व्यक्त केले.

"डाळिंब पिकाचे व्यवस्थापन" या विषयावर ते बोलत होते, क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व हॉर्टिसेप ,आत्मा प्रकल्प 2022-23 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा यांचे वतीने तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांनी प्रास्ताविक केले, श्रीगोंदा तालुक्यात 3500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर डाळिंबाची लागवड असून मग्रारोह योजनेअंतर्गत डाळिंब पिकाच्या लागवडीस कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते ,तसेच डाळिंब पिकाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता यावरील वाढत्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आज या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कृषी विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत तालुक्यात प्रशिक्षण सुरू आहेत असे दिपक सुपेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमास राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार विजेते मारुती डाके, सामाजिक कार्यकर्ते भाई इनामदार, प्रगतशील शेतकरी परेश वाबळे, संभाजी हिरवे, सूर्यकांत भोईटे, योगेश कांडेकर,नवनाथ विधाते, सागर रायकर,याकूब मुन्ना शेख,सुहास भापकर,शिवाजी पठारे,संभाजी पठारे,देविदास थिटे ,सर्जेराव कदम तसेच श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,विशेष म्हणजे प्रशिक्षणासाठी तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती,कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संदीप बोदगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मा प्रकल्प टीम चे नंदकुमार घोडके,अनिल औटी यांनी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com