जोडवं कादंबरी तपासी अधिकाऱ्याला मार्गदर्शक ठरेल - न्या. देबडवार

जोडवं कादंबरी तपासी अधिकाऱ्याला मार्गदर्शक ठरेल - न्या. देबडवार

नेवासा l तालुका प्रतिनिधी

न्यायिक क्षेत्रातील आमचे सहकारी न्या.दिनकरराव आरगडे यांनी पूर्ण अभ्यासाअंती लिहिलेली जोडवं ही कादंबरी तपासी अधिकाऱ्याला गुन्ह्याचा तपास करतांना मार्गदर्शक ठरेल असा आशावाद उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.यु. देबडवार यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील सौंदाळा गावचे सुपुत्र व पुणे कामगार न्यायालयाचे न्यायाधीश दिनकरराव आरगडे यांनी लिहिलेल्या "जोडवं" कादंबरीचे प्रकाशन रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिरात न्यायमूर्ती बी.यु.देबडवार यांचे हस्ते व साहित्यिक डॉ.संजय कळमकर, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरी महाराज, जिल्हा न्यायाधीश संगमनेर तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटना न्या.दिलीपराव घुमरे, जिल्हा न्यायाधीश संगमनेर न्या.कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर नेवासा न्या.चौधरी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर कोपरगाव न्या. अभिजीत डोईफोडे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त पुणे सतीश लंके, सहाय्यक धर्मदाय आयुक्त औरंगाबाद न्या. मनोज बुधवंत, अप्पर सचिव, विधी व न्याय मंत्रालय पुरुषोत्तम खुळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर औरंगाबाद न्या.योगेश पुजारी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर औरंगाबाद न्या.राजेश तुवर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर औरंगाबाद न्या.बाळासाहेब खंडागळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर औरंगाबाद न्या.ईश्वर सूर्यवंशी, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग औरंगाबाद न्या.अमितेश माने,न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीरामपूर न्या.खराडे, अहमदनगर शहर वकील संघटनेचे अध्यक्ष एड. भूषण बराटे, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ सरकारी वकील एड. किशोर लोखंडे यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना न्या.देबडवार पुढे म्हणाले, न्या.आरगडे यांनी न्यायिक जबाबदारीचे कामातून वेळ काढून आपल्यातील लेखन जागा ठेवून लिखाण केले. अंत्यत साध्य व सोप्या भाषेत लिहिलेली ही कादंबरी रुचकर व वाचनीय आहे. कादंबरीतील खुनाचा तपास लावण्यासाठी जोडव्या सारखी छोटीशी वस्तूही किती महत्वाची असते, त्याच बरोबर कायदा काय सांगतो याचे स्पष्टीकरण ही या कादंबरीत दिलेले असल्याने तपासी अधिकाऱ्याला हे मार्गदर्शक ठरणार आहे. न्या.आरगडे यांनी सोप्या भाषेत व सर्वसामान्य नागरिकाला सहज समजतील आणि कायद्याचे ज्ञान त्यांचे पर्यंत पोहचेल यासाठी कायद्याची पुस्तके ही लिहावीत.

साहित्यिक डॉ.संजय कळमकर म्हणाले, श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिरात साहित्य, कायदा व अध्यात्म यांचा आज त्रिवेणी संगम झालेला. वाचकाला सहज समजेल अशी ओघवती भाषा साहित्याची असली पाहिजे. ती या कादंबरीत आहे. आजची न्याय व्यवस्था ही सरकारला समांतर व्यवस्था आहे. सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यात न्याय व्यवस्थेचा मोठा हात आहे. समाजात जेजे उपेक्षित आहेत, ज्यांच्या कडे समाजाचे लक्ष नाही ते साहित्याने मांडले पाहिजे. उध्दव महाराज मंडलिक, सुनीलगिरी महाराज,पांडुरंग अभंग,न्या.कुलकर्णी, न्या.घुगरे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

कादंबरी लेखक न्या.दिनकरराव आरगडे यांनी प्रास्ताविक करतांना महाविद्यालयीन जीवनात अर्धी लिहिलेली अपूर्ण कादंबरी कोविडच्या सुट्ट्यांचे कालावधीत ती लिहून पूर्ण केली असल्याचे सांगितले.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे, नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, तुकाराम मिसाळ, अण्णासाहेब आरगडे, निवृत्ती काळे, अड.बाळासाहेब शिंदे, अड.अण्णासाहेब अंबाडे, अड.प्रदीप वाखुरे, अड.ए.बी.तांबे, अड.बाबा औताडे, अड.पाठे, सहकार न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अड. मिलिंद सोमण, अड.एम.डी. पवार, अड.संजय सानप, अड.एस.एम. काळे, अड.जाधव, अड.बाळासाहेब कराळे आदी उपस्थित होते. डॉ.रेवनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com