कोपरगावमध्ये सलग चौथ्या दिवशी सापडले 16 रूग्ण

कोपरगावमध्ये सलग चौथ्या दिवशी सापडले 16 रूग्ण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी |Kopergaon

कोपरगाव शहरात काल सलग चौथ्या दिवशी 16 जणांचे करोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्या 10 अहवालांपैकी 3 अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहेे. तर दुपारी 174 करोना संशयित व्यक्तीच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात तुरुंगातील 5 कैद्याचा समावेश आहे.

तालुक्यातील तीळवणी येथील एका व्यक्तीची खासगी लॅब कोरोना चाचणी केली असता त्या रुग्णांचा देखील अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे काल 31 जुलै रोजी कोपरगावात 16 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे.

त्यामध्ये सकाळी सापडलेले लक्ष्मीनगर मधील 35 वर्षीय महिला, राममंदिर रोड येथील 35 वर्षीय महिला, तर तालुक्यातील सुरेगाव येथील 42 वर्षीय महिला अश्शा तीन रुग्णांचा समावेश आहे तर दुपारी स्वामी समर्थनगर येथील 30 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 60 वर्षीय पुरुष, कोळपेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, गांधी नगर मधील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, गोरोबा मंदिर परिसरातील 45 वर्षीय महिला तर समतानगर मधील 38 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत 101 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 52 रुग्ण उपचार घेत आहेत. एक महिला मयत तर 48 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com