बोठेच्या स्टॅडिंगवरची सुनावणी लांबली

आता 'या' तारखेला होणार निर्णय
बोठेच्या स्टॅडिंगवरची सुनावणी लांबली

अहमदनगर (प्रतिनिधी)

पोलिसांनी कोर्टाकडून मिळविलेले स्टॅडिंग वॉरंट रद्द करावे या मागणीसाठी बोठेने कोर्टात केलेल्या अपीलावर आज मंगळवारी होणारी

सुनावणी लांबणीवर पडली आहे. 18 फेब्रुवारीला त्यावर आता सुनावणी होणार आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात फरार असलेला बाळ बोठे शोधूनही सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टॅडिंग वॉरंट जारी केले आहे. पारनेरच्या कोर्टाने स्टॅडिंग वॉरंटला परवानगी दिली आहे. पारनेर कोर्टाच्या निर्णयाविरोधात बोठेने सेशन कोर्टात अपील केले आहे. आज मंगळवारी त्यावर सुनावणी होती, पण बोठेचे वकिलच कोर्टात उपस्थित नव्हते. त्यामुळे कोर्टाने सुनावणीसाठी 18 तारीख ठेवली आहे.

दरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अनिल ढगे हे बाजू मांडणार आहेत. ते आजच्या सुनावणीला उपस्थित होते. पण आज सुनावणी न झाल्याने त्यांचा युक्तीवाद झाला नाही.

बोठे सापडेनाच

30 नोव्हेंबरला हत्याकांड झाल्यापासून बोठे फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक मागावर असले तरी पथकाला हुलकावणी देत तो पसार होण्यात यशस्वी झाला आहे. लूक आऊट नोटीस आणि नंतर स्टॅडिंग वॉरंट आणि पुढे प्रापर्टी जप्तीची कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com