कोपरगावमध्ये करोनाचा कहर थांबेना
सार्वमत

कोपरगावमध्ये करोनाचा कहर थांबेना

तालुक्यात पुन्हा 12 करोना बाधित

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

सलग पाचव्या दिवशी कोपरगावत करोनाचा कहर थांबेना. शहरातील रुग्णांच्या संपर्कातील 52 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. खाजगी लॅब मधे तपासणी केलेल्या एका कोळगाव थडी 20 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दिवसभरात कोपरगाव तालुक्यात 12 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 30 जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे .

करोनाच्या दहशतीची छाया कोपरगाव शहरासह तालुक्यावर गडद होत आहे. दिवसेंदिवस कोपरगाव करोना बाधित रुग्णांचा आलेख वाढताच असून यावर खबरदारी म्हणून ठोस काही तरी उपाय करणे गरजेचे झाले आहे. काल दिवसभरात कोपरगाव तालुक्यात ऐकूण 12 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.

30 जणांचे स्राव अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. बाधीत रुण्यांमध्ये शहरातील इंदिरानगर येथील 50 वर्षीय महिला, गांधीनगर येथील 45 व 26 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथील 64 वर्षीय पुरुष 59 वर्षीय महिला, गुरुद्वारारोड येथील 25 व 42 वर्षीय पुरुष, सुभाषनगर येथील 50 वर्षीय पुरुष, बैलबाजार रोड येथील 52 वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील पढेगाव येथील 8 वर्षीय मुलगा तर तालुक्यातील मंजूर येथील एक 60 वर्षीय महिला, कोळगाव थडी येथील 20 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात कालपर्यंत एकूण 113 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 74 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. एक महिला मयत तर 38 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com