Video : सरकारने अतिवृष्टी मदतीचा पुनर्विचार करावा

Video : सरकारने अतिवृष्टी मदतीचा पुनर्विचार करावा

नेवासा | तालुका प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 4 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सरकारने या मदतीचा पुनर्विचार करावा अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

सूर्यवंशी पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांचे अवशेष शेतातून बाहेर काढण्यास ही हे एकरी दिलेले 4 हजार रुपये पुरणार नाहीत. मग ही मदत नक्की जमीन दुरूस्ती साठी आहे का? पिकांचे नुकसान झाले आहे म्हणून आहे? एकरी 6 हजार रुपये फळबागेला देताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना विचार करण्याची गरज होती. लहान मुलांच्या सारखे वाढवलेली फळबाग या पावसात आडवी झाली आहे. ती उभा राहू शकत नाही. राज्य सरकारने बळीराजाला मदत देताना सन्मान पूर्वक मदतीची घोषणा करणे गरजेचे होते. पण जे बोलतात ते काही करू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध करून दाखवले आहे.

वेळ प्रसंगी शेतकर्यांच्यासाठी कर्ज काढू अशी भीम गर्जना करून दोन दिवस झालेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. 2019 मध्ये फडणवीस सरकारने एक अध्यादेश काढून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना जिरायतीसाठी हेक्टरी 20 हजार 500, बागायतीसाठी 40 हजार 500 आणि फलबागेसाठी 54 हजार मदत जाहीर केली होती. त्याच धर्तीवर सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी या प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या घोषणेमुळे सरकार शेतकऱ्यांच्या किती मागे हे सिद्ध होते. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्यसाठी महाराष्ट्र बंद करणारे हेच सरकार आहे का? हा मोठा प्रश्न आहे .नुकसानीचे पंचनामे झाले असल्याचे पुनर्वसन मंत्रांचे म्हणणे साफ खोटे आहे असे ही सूर्यवंशी म्हणाले.

Related Stories

No stories found.