विमानसेवा सुरू, चेन्नईवरून १७२ प्रवाशी घेऊन विमान शिर्डीत दाखल

विमानसेवा सुरू, चेन्नईवरून १७२ प्रवाशी घेऊन विमान शिर्डीत दाखल

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)

दीड वर्षांपासून करोनामुळे बंद असलेले कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी विमानतळ रविवार पासून सुरू झाले.

स्पाईसजेट कंपनीचे विमान चेन्नई वरून १७२ प्रवासी घेऊन आले. तेच विमान ३८ प्रवासी घेऊन गेले. काकडी येथील ग्रामस्थ व टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी विमान प्रवाशांचे शाल देऊन व पेढा भरवून स्वागत केले. या स्वागतामुळे साईभक्त प्रवासी भारावले आता साई भक्तांना शिर्डीत येण्यासाठी विमानाची सेवा उपलब्ध झाली आहे.

एप्रिल २०२० मध्ये करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते. साई मंदिरही बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही खुली झाल्याने विमान सेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरुवातीला आज चेन्नई याठिकाणची विमानसेवा स्पाईसजेट ने सुरू केली आहे. दिल्ली व हैद्राबादची विमानसेवा लवकरच सुरू होईल. यापुढे प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार विमानांच्या फेऱ्या वाढणार आहेत. दृष्यमानतेमुळे मागे अनेकवेळा विमान उड्डाणे रद्द होती.

अठरा महिन्यांनंतर विमानसेवा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरात लवकर पुर्वी सुरू असलेली सर्व २८ विमानसेवा या विमानतळावरून सुरू व्हावी, अशी साईभक्तांची अपेक्षा आहे. काकडी येथील ग्रामस्थ व टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विमान प्रवाशांचे शाल देऊन व पेढा भरवून स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com