ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार

ना. वडेट्टीवार | नगरमध्ये संघटनात्मक काम उत्तम
ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार

अहमदनगर | प्रतिनिधी

राज्यात करोना आणि पुरपरिस्थितीमुळे जनतेला तातडीने मदत पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. बाधितांना मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.

ओबीसी प्रश्नांसंदर्भातही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत होत आहे. ओबीसींना जोपर्यंत त्यांचे हक्क मिळणार नाही, तो पर्यंत हा लढा असाच सुरु राहील, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.

राज्य सरकार ओबीसींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नगरमध्ये ओबीसी संघटनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने या लढ्यास यशही येत आहे. प्रभा पॅलेसचे संचालक नेहमीच सामाजिक जाणिवेतून काम करतात ही चांगली काम बाब आहे. त्यांची सहकार्याची भुमिका कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. त्यांनी नगरला धावती भेट दिली. यावेळी विष्णू फुलसौंदर व अवधुत फुलसौंदर यांनी केले. विक्रम राठोड, अमोल जाधव, बाळासाहेब भुजबळ, डॉ. सुदर्शन गोरे आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com