video : दूध दराचा लढा संपलेला नाही : डॉ.अजित नवले

video : दूध दराचा लढा संपलेला नाही : डॉ.अजित नवले

दूध उत्पादकांसाठी सुरू केलेला लढा ( milk price) संपलेला नाही. सरकारने ( maharashtra government )दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे पहिले यश आहे. जोपर्यंत दूध उत्पादक शेतकर्‍यांना संपूर्ण न्याय मिळत नाही, तोवर आपण लढत राहून, असे किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले ( dr.ajit nawale ) यांनी ‘सार्वमत संवाद’ या कार्यक्रमात सांगीतले.

दूधाला एफआरपीबाबत सरकारने पावले वेगाने टाकावीत. दूधाचा करोना काळापूर्वीचा दर तातडीने द्यावा, या मागण्या मान्य झाल्यानंतर किमान दोन आठवड्याचा काळ स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक आहे. या काळात शेतकर्‍यांना दरवाढ मिळेल, असे अपेक्षीत आहे. दूध दरावर कायमस्वरूपी उपायांची मागणी सरकारकडे लावून धरली आहे. मात्र खासगी दूध संघ आणि त्यांच्या नफ्यात नेत्यांचे गुंतलेले हितसंबंध यामुळे टप्प्याटप्प्याने हा लढा पुढे न्यावा लागेल, असे ते म्हणाले. अमोल वैद्य यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Related Stories

No stories found.