झाडांचा पाचवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

राहाता शहरात साई योग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
झाडांचा पाचवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

राहाता (प्रतिनिधी) / Rahata - वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेता साई योग फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने वृक्षांचा पाचवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

राहाता येथील पंचायत समिती कर्मचारी सोसायटीच्या प्रांगणात झाडांची पूजा केली गेली. चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. परिसरातील झाडांना रंगीबेरंगी फुग्यांनी तसेच पताका लावून सजवण्यात आले. झाडांना केलेले डेकोरेशन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. वाढदिवसासाठी उपस्थितांना चहा, नाष्ट्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

साई योग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापुसाहेब पानगव्हाणे यांनी पाच वर्षापूर्वी राहाता शहरात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. बघता बघता विविध स्तरातील नागरिक यात सहभागी होत गेले. शहरातील विविध भागात 2500 हून अधिक झाडे लावण्यात आली. त्यातील 2000 झाडे शहरवासियांना सावलीसोबत प्राणवायू देत आहेत.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, स्विकृत नगरसेवक डॉ. राजेंद्र पिपाडा, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय उबाळे, शरद निमसे, नागेश गायकवाड, डॉ. पांडुरंग गुंजाळ, डॉ. बापुसाहेब पानगव्हाणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान वृक्ष लागवडीसाठी वृक्ष भेट देणारे तसेच झाडांचे पालकत्व स्विकारणार्‍या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विजय बोरकर, नगरसेविका अनुराधा तुपे, सराफ असोसिएशनचे अशोक बोराडे, अरविंद बावके, गोरख दंडवते, बाळासाहेब गाडेकर, संजय वाघमारे, पांडुरंग गायकवाड, मोहन तांबे, बबलू फटांगरे, विनोद गाडेकर, राजू वायकर, भाऊसाहेब बनकर, राजू पठाण, दिपक दंडवते, उमेश लुटे, पांडुरंग गायकवाड, दीपक गाडेकर, अनिल सातव, भोजराज खांडरे, प्रताप गमे, रवींद्र धस, विठ्ठल निर्मळ, दासकाका कुंभकर्ण, प्रशांत सरदेसाई, लायन्सचे उपाध्यक्ष विनोद गाडेकर, राजेंद्र फंड, योगगुरू सुभाष भिंगारदिवे आदींसह महिला व बालगोपाळांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. करोना संकटात ऑक्सिजनच्या कमतेरतेमुळे झाडांची किंमत सर्वांनाच कळली. साई योग फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वृक्ष चववळीत आम्हालाही योगदान देता आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले. वृक्ष जीवन जगण्यासाठी उर्जा देतात त्यामुळे झाडांचा हा अनोखा वाढदिवस साजरा करताना मनस्वी आनंद होत आहे.

- समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी

ही चळवळ पाच वर्षापूर्वी एका प्रसंगातून सुरू झाली. एका नातेवाईकाच्या अत्यंविधीसाठी गेलो असता तेथे एकही सावली देणार झाड नव्हते. रखरखत्या उन्हात लोकांना सावली नाही हे शल्य मनाला बोचले. साई योग फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही योग करत होतो. या सर्व सदस्यांना वृक्ष लागवडीची संकल्पना सांगितली व सर्व लगेच तयार झाले. शहरात आत्तापर्यत 2500 झाडे लावली. त्यातील 2000 बहरली आहेत. वृक्ष लागवड करून न थांबता दर गुरूवारी, रविवारी झाडांना पाणी देणे, ती नष्ट होऊ नये म्हणून सुरक्षा जाळी लावणे, झाडाला आकार देणे आदी कामे मंडळाचे सदस्य आनंदाने करतात.

- डॉ.बापुसाहेब पानगव्हाणे, संस्थापक साई योग फाउंडेशन

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com