मुलीवरच केला बापाने अत्याचार

मुलीवरच केला बापाने अत्याचार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अल्पवयीन असलेल्या मुलीवरच नराधम बापाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ढोलेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढोलेवाडी परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबातील मुलीची आई ही बाहेरगावी गेली होती. तर सदर अल्पवयीन मुलगी ही घरात झोपलेली होती. त्यावेळी तिचा बाप हा घरात आला. त्याने सदर मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतरही पुढे त्याने वारंवार अत्याचार केले. अखेर सदर मुलीने आईला ही घटना सांगितली.

पतीने आपल्याच मुलीशी असे कृत्य केल्याने सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अत्याचार व पोस्को 6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहे.

Related Stories

No stories found.