सेना शहरप्रमुखपदाकडे लागले अनेकांचे डोळे!

सोशल मीडियावर चर्चेला उधाण
सेना शहरप्रमुखपदाकडे लागले अनेकांचे डोळे!

अहमदनगर (प्रतिनिधी)

अवैध बायोडिझेल तस्करी प्रकरणात दिलीप सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पक्षाकडून सध्या हे पद स्थगित ठेवण्यात आले असले तरी या पदासाठी शिवसेनेतील इच्छुकांनी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक जण शहरप्रमुख पदाकडे डोळे लावून बसले आहेत. सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेना पक्षात शहरप्रमुख पद वजनदार मानले जाते. यामुळे आता या पदासाठी आता अनेकजण इच्छूक आहेत. यात माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, हर्षवर्धन कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेना नगर नावाच्या फेसबुक पेजवर भावी शहरप्रमुख म्हणून अनेकांच्या नावावार चर्चा होत आहे. शहरप्रमुख स्व. अनिल राठोड यांना मानणारा व त्यांच्या विचारांना पुढे नेणारा असावा, अशा भावनाही येथे व्यक्त केल्या जात आहे.

नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या पदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शहरप्रमुख पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com