करोना लढ्यासाठी नगर जिल्ह्याला मिळणार 14 कोटी

करोना उपाररोजनांसाठी आमदारांच्रा निधीतून 1 कोटी खर्च होणार!
करोना लढ्यासाठी नगर जिल्ह्याला मिळणार 14 कोटी

पुणे, अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपरे खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता रेणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्याला 14 कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार असून करोना लढ्याला आणखी बळ येणार आहे.

करोनाचे संकट वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर करोनावर मात करण्यासाठी आमदारांना 1 कोटीच्या खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. या आमदार निधीतून 350 कोटी महाराष्ट्रात करोनावर खर्च करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात 12 विधानसभा सदस्य आहेत. तर एक पदवीधर मतदारसंघाचे एक आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक सदस्य असे एकूण 14 आमदार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याला 14 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून विविध उपाययोजना करण्यात येतील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com