निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी, मात्र...

अकोले तालुक्यात प्रवरेचा पूर लागला ओसरू
निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी, मात्र...

अकोले | प्रतिनिधी

निळवंडे धरणाचा (Nilwande Dam) विसर्ग कमी केल्यामुळे अकोल्यात (Akole) प्रवरेच्या (Pravara River)पुराचे पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. मात्र अद्यापही निळवंडे धरणातून (Nilwande Dam Update) मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वहात आहे

भंडारदरा (Bhandardara) पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे काल सोमवारी निळवंडे धरणातून Nilwande Dam Water) मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात आले. रात्री अकरा वाजता 20615 क्यूसेक विसर्ग होता. तो रात्री पाऊण वाजता 30 हजार 28 क्यूसेक करण्यात आला. त्या मुळे प्रवरा नदीला (Pravara River Flood) पावसाळ्यात प्रथमच पूर आला.

प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पुलासह विविध सेतू पूल पाण्याखाली गेले होते. अकोल्याची स्मशान भूमी निम्मी पाण्याखाली गेली होती. प्रवरा नदीवरील सर्व सेतू पूल (Pravara River Pool) पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नदी पात्रा जवळील स्मशान भूमी वरून पुराचे पाणी गेले होते. या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी ठीकठिकाणी गर्दी केली होती.

पावसाचा जोर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी खूपच कमी झाला. त्यामुळे भंडारदरा तसेच निळवंडेचा विसर्ग कमी करण्यात आला. आज दुपारी बारा वाजता भंडारदरा विसर्ग 3252 क्यूसेक होता तर निळवंडे विसर्ग 12990 क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. तर दुपारी 2 वाजता निळवंडेचा विसर्ग 6244 क्यूसेक इतका कमी करण्यात आला. विसर्ग कमी झाल्यामुळे अकोले तालुक्यात प्रवरेचा पूर ओसरू लागला आहे. सायंकाळ नंतर अकोलेत पुराचे पाणी खूपच कमी होऊन सेतू पुलावरील वाहतूक सुरू होईल असा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com