आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती

देवळालीच्या घटनेने कोपरगावच्या चासनळीतील प्रकार उघडकीस
आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती

चासनळी (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात अॅडमिट करून न घेतल्याने कावेरी बर्डे या महिलेने गेटसमोरच थंडीच्या कडाक्यात उघड्यावर बाळाला जन्म दिला.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील महिलेस दवाखान्यात दाखल न करून घेतल्यामुळे रस्त्यातच प्रसुती झाल्याचे वृत्त झळकताच चासनळीची घटना उघडकीस आल्याने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या याही प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी संतापाची लाट पसरली आहे.

आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती
सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का...

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील सौ. कावेरी विजय बर्डे (वय २२) या महिलेला रात्री नऊच्या सुमारास पोटात कळा लागल्याने चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात नेहमीप्रमाणे डॉक्टर आणि नर्स हजर नसल्यामुळे तेथील हजर असलेल्या एका कर्मचाऱ्याने डॉक्टर नर्स नाहीत म्हणून अॅडमिट करण्यास नकार दिला. नातेवाईकांनी किमान दुसरीकडे नेण्यासाठी रुग्णवाहीका तरी द्या, अशी विनंती केली.

मात्र रुग्णवाहिकेला डिझेल नसल्याचे कारण देत तीही नाकारली. यात बराच कालावधी गेला. त्यातच थंडीचा कडाका होता. अशातच सदर महिलेची प्रसुती गेट समोरच झाली. या प्रकारामुळे महिलेचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर, नर्स हजर नसल्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. ही घटना १२ जानेवारीला घडली होती. देवळालीच्या घटनेचे वृत्त झळकताच याही घटनेचा भांडाफोड झाला.

आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथान कारभाराविषयी दैनिक सार्वमतने बऱ्याच वेळा आवाज उठविला आहे. शासनापर्यंतही तो आवाज गेला. परंतु सुस्त झालेल्या यंत्रणेला जाग आलीच नाही. चासनळी ग्रामसभेने डॉक्टरच्या बदलीविषयी ग्रामसभेत ठराव करूनही बदली झाली नाही. मागील आठवड्यात मुदत बाह्य झालेली औषधे बाजार तळावर फेकण्यात आली. त्याविषयीही सार्वमतने आवाज उठविला. मात्र एवढे झाल्यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्रात काही फरक पडला नाही. या घटनेमुळे तर सर्व घटनांवर कळस चढवला.

आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यावर व औषधावर शासन करोडो रुपये खर्च करतो रात्री-अपरात्री एकही डॉक्टर अथवा नर्स हजर राहत नाही. फक्त बोलण्यात हुशार असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना अरेरावी करण्यात पटाईत आहे. त्यामुळे बाहेरील कर्मचारी येथे येण्यास धजावत नाहीत. येथून बदली करण्यासाठी प्रयत्न करत असतात. डॉक्टरवर जर कारवाई होत नसेल तर सामान्य मजूर महिलेवर जो अन्याय झाला तो इथून पुढे होत राहील. सुदैवाने बाळ बाळंतीण जरी सुखरूप असली पुरोगामी समजल्या जाणाऱ्या ह्या महाराष्ट्रात अशा घटना ते अजूनही घडतात याला जाब कोण विचारणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील या बद्दल यामागे निवेदन दिलेले आहे.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत डॉक्टरची चौकशी झाली. कर्मचारी व ग्रामस्थांनी याविषयी जबाब घेण्यात आले. त्याचे पुढे काय झाले काही कळाले नाही. डॉक्टरला कोण पाठीशी घालत ? यातून ससेहोलपट होती ती सर्वसामान्य माणसाची. त्यामुळे या घटनेची वरीष्ठपातळीवर चौकशी होऊन दोषींना कडक शासन व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दोषींवर कारवाई करा : सौ. कोल्हे

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेने कडाक्याच्या थंडीत रात्री दवाखान्याच्या बाहेरच उघडयावरच बाळाला जन्म दिला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी निर्दयी प्रवृत्तीची असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी देऊन याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तकार केली आहे.

शासन एकीकडे बेटी बचाव म्हणून नारा देत आहे मात्र दुसरीकडे तिच्यावर अन्यायाचे फटकारे मारून गर्भवती महिलेच्या हालअपेष्टा दुर्लक्षीत करून तिला बाळंतपणासाठी दवाखान्यांत दाखल करून घेतले जात नाही ही घटना मन सुन्न करणारी आहे. रात्री अपरात्रीच्यावेळी असहय वेदना होणाऱ्या महिलांना बाळंतपणांसाठी नकार देणाऱ्या संबंधित जबाबदार वैद्यकिय अधिकाऱ्यासह उर्वरित कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांचेवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.

आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

Related Stories

No stories found.