शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा निर्णय रद्द करणार

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा निर्णय रद्द करणार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

राज्यातील शाळा दिल्लीच्या धर्तीवर स्मार्ट करण्याचा प्रयत्न या पुढील काळात करणार आहोत. तसेच लवकरच राज्यातील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहण्याच्या बंधनाचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असे अश्वासन ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येथे केले.

पारनेर येथील खंडेश्वर मंगल कार्यालयात प्राथमिक शिक्षक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मुश्रीफ बोलत होते. राज्य शिक्षण परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रा.या.औटी यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, लवकरच शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सध्या सरकारी पातळीवर सुरू आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहावे लागणार नाही मात्र शिक्षकांनी वेळेत शाळेत उपस्थित रहावे अन्यथा या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती प्रशांत गायकवाड, उदय शिंदे, संजय कळमकर, जगन्नाथ भोर, भास्कर पाटील, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, मधुकर उचाळे, बा. ठ. झावरे, विजय औटी, संजय धामणे, गंगाराम बेलकर, रावसाहेब सुंबे, नितीन काकडे, बाबासाहेब जगताप, संभाजी औटी, संजय वाघमारे, सखाराम औटी, सुदर्शन शिंदे, बाजीराव पानमंद, बापूसाहेब तांबे, संजय शेळके, राजेंद्र निमसे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब बुगे, सतीश भालेकर, डॉ बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com