वानराच्या मृत्युने ग्रामस्थांना अश्रू अनावर

अंत्यविधीला मोठी गर्दी
वानराच्या मृत्युने ग्रामस्थांना अश्रू अनावर

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील (Pathardi) डांगेवाडी (Dangewadi) येथे गेल्या काही दिवसांपासून चार-पाच वाणर (Monkey) गावातील विविध झाडावर दिसून येतात. यापैकी एका वानराचा (Monkey) शनिवारी सकाळी मृत्यू (Death) झाल्याचे ग्रामस्थांच्या (Villagers) निदर्शनास आले.

शनिवार हा रामभक्त बजरंगाचा वार मानला जातो. वानराला मृत (Monkey Death) अवस्थेत पाहून गावातील ग्रामस्थांना (Villagers) देखील अश्रु (Tears) अनावर झाले. त्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन त्यांनी या वानराची विधिवत अंत्ययात्रा (monkey funeral) काढली व गावातील हनुमान मंदिराजवळच (Hanuman Temple) या वानराचा दफन विधी (Monkey burial ceremony) केला. आता या वानराचा चौदावा घातला जाणार असून 14 व्या च्या दिवशी वानराच्या मूर्तीची हनुमान मंदिराजवळ स्थापना केली जाणार असून या दिवशी बालब्रह्मचारी महाराजांची किर्तनरुपी सेवा देखील होणार असल्याची माहिती माजी सभापती विष्णुपंत अकोलकर (Vishnupant Akolkar) यांनी दिली.

डांगेवाडी गाव वारकरी संप्रदायातील असल्यामुळे गावातील भजनी मंडळीने या मृत वानराची ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढलेली अंत्ययात्रा व त्या अंत्यविधीत (Funerals) सहभागी झालेला मोठा जनसमुदाय प्रत्येकाला असे वाटायचे जणूकाही आपल्याच घरातील एखादी व्यक्त आज आपल्याला कायमचे सोडून गेलेली आहे. या भावनेतून महिलासह पुरुषांना देखील अश्रू (Tears) आवरता आले नाहीत. या मृत वानराचा दफन विधी व त्यानंतर पुढे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाची तालुकाभर चर्चा सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com