अकोले (प्रतिनिधी) -

अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात काल सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर

बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेल्या महिलेला एका बिबट्याने जखमी केले. या घटनेत दुचाकी वरील दोघे ही बालंबाल बचावले.

कैलास माधव पुंडे व मनीषा कैलास पुंडे हे दांपत्य ढोकरीहून अकोलेकडे जात असताना गाव परिसरात असताना बिबट्याच्या जोडीने अंधाराचा फायदा घेऊन या दुचाकीस्वारांवर हल्ला चढविला. मागे बसलेल्या मनीषा पुंडे यांच्या पायावर व कंबरेवर पंजा मारल्याने जखमी झाल्या, मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेतल्याने व आरडाओरडा केल्याने बिबटे पसार झाले. त्यांच्यावर अकोले सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी शरद कचरू शेटे यांच्यावरही बिबट्याने असाच हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या हातात असलेल्या कुदळीने प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने माघार घेतली. परिसरात बागायती शिवर असल्यामुळे सतत बिबट्याचे वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी गोविंदराव पुंडे, विकास शेटे, बाबाजी पुंडे, प्रकाश पुंडे, नवनाथ पुंडे, साईनाथ पुंडे आदिनी केली आहे.