अहमदनगर (प्रतिनिधी) -

पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटने देशाच्या विविध भागात करोना लसीचा पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. नगर जिल्ह्यात ही लस

आज (बुधवारी) सकाळपर्यंत दाखल होणार आहे. दरम्यान, शनिवार (दि.16) पासून जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी यांचे करोनाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी गेल्या आठवड्यात मनपा हद्दीत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात ड्राय रन करण्यात आला. हा ड्राय रन यशस्वी झाल्याने आता शनिवारपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. सरकारच्या आदेशानूसान पाहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यात 31 हजार 921 सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. नगरच्या लष्कराच्या रुग्णालयाच्या देखरेखी खाली जिल्ह्यात आज करोनाची लस दाखल होणार आहे. जिल्ह्यात शनिवारपासून प्रत्यक्षात करोना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका हद्दीत आठ तर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अशा 13 ठिकाणी करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुरूवातील 25 जणांना करोनाची लस देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी सांगितले.

या ठिकाणी आहेत लसीकरण केंद्र

जिल्हा रुग्णालय, पाथर्डी आणि कर्जतचे उपजिल्हा रुग्णालय, यासह जामखेड, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, नगर शहरातील मनपाचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, तोफखाना आरोग्य केंद्र, मुकूंदनगर आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, जुने सिव्हील आणि महात्मा फुले आरोग्य केंद्र या ठिकाणी करोना लसीकरण करण्यात येणार आहेत.

दररोज 25 लोकांचे लसीकरण

जिल्हा आरोग्य यंत्रणेने सरकारच्या आरोग्य विभागाच्या सुचनेनूसार ड्राय रनच्या वेळी तीन ठिकाणी प्रत्यक्षात 25 लोकांच्या लसीकरणाचे प्रत्याक्षिक केले होते. याच धर्तीवर आता शनिवारपासून दररोज एका केंद्रात आरोग्य यंत्रणेतील 25 लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लस टोचल्यानंतर संबंधीतांना 30 मिनीट निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

तालुकानिहाय लसीकरण

नगर 2 हजार 906, मनपा हद्द 6 हजार 108, अकोले 1 हजार 651, जामखेड 867, कर्जत 1 हजार 272, कोपरगाव 299, नेवासा 1 हजार 369, पारनेर 1 हजार 137, पाथर्डी 949, राहाता 7 हजार 160, राहुरी 1 हजार 204, संगमनेर 2 हजार 504, शेवगाव 1 हजार 735, श्रीगोंदा 1 हजार 55 आणि श्रीरामपूर 1 हजार 305 अशा 31 हजार 921 आरोग्य यंत्रणेतील लोकांचे करोना लसीकरण होणार आहे.