ना.थोरात, आ.डॉ.तांबे यांच्यावरचा विश्वास ढळला...

भुजबळ असे का म्हणाले?....
ना.थोरात, आ.डॉ.तांबे यांच्यावरचा विश्वास ढळला...

अहमदनगर | ahmednagar -

कोणत्याही मुद्यावर एकमत नसलेल्या नगर शहर काँग्रेसमधील congress आयटी पार्कच्या information technology park मुद्यावरील मतभेदही समोर आले आहेत. अहमदनगर शहर काँग्रेस माजी अध्यक्षांनी याप्रकरणी विद्यमान शहर जिल्हाध्यक्षांवर आरोप केले आहेत.

आयटी पार्क प्रकरणी व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या किरण काळे यांचे प्रयत्न काँग्रेसचा उपक्रम नाही. मूळ प्रश्नाला बगल देऊन वैयक्तिक द्वेषापोटी आरोप होत असल्याने काँग्रेस पक्ष बदनाम होत आहे, असा आरोप अहमदनगर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केला आहे.

या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्ते काळे यांच्या मताशी सहमत नाही. याकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole आणि महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी या नेत्यांकडे केली आहे. काळे यांनी शिवालयात जावून शिवसेनेचे shivsena दिवंगत नेत्यांना अभिवादन करतांना येथूनच काँग्रेसला दिशा मिळते, अशा प्रकारचे वक्तव्य केले. यावरून काळे यांचा पक्षनेते ना.थोरात, आ.डॉ.तांबे यांच्यावरचा विश्वास कमी झाल्याचे स्पष्ट होते, असे भुजबळ यांनी सांगितले. शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांची मते पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे, असेही त्यांनी सांगीतले.

सत्य परेशान हो सकता है...

आयटी पार्कच्या पोलखोल प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल असणार्‍या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी फलक लावले आहेत. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी काळे यांच्या बरोबर आहेत.ते पोलीस कारवाईला तसेच अटकेला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. मात्र असे किळसवाणे कृत्य करणारे लोकप्रतिनिधी शहरासाठी घातक आहेत, अशा संतापाचा सूर शहरामध्ये असल्याचा दावा शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com