शेवगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दूरवस्था

मंजूर रस्त्यांचे काम तातडीने सुरू न केल्या अधिकार्‍यांना काळ फासण्याचा इशारा
शेवगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दूरवस्था

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

शेवगाव शहरात येणार्‍या तसेच शहराबाहेर जाणार्‍या सर्वच प्रमुख रस्त्यांची तसेच तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील रस्त्यांची ही सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. प्रमुख रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून मोठ्या अपघाताचीही भीती वाढल्याने नागरिक ग्रामस्थांतून संतापाचा सूर व्यक्त होत आहे.

यापैकी ज्या ठिकाणी रस्ते मंजूर आहेत त्या रस्त्यांचे काम तातडीने सुरु व्हावे. तसेच ज्या रस्त्यांचे दुरुस्तीचे काम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्या रस्त्यांची तातडीने दुरस्ती होवून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले असून याबाबत दिरंगाई दिसून आल्यास येत्या 2 नोव्हेंबर रोजी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतुत्वाखाली ठिय्या आंदोलन पुकारण्याचा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकार्‍यांना प्रसंगी काळे फासण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, शेवगाव शहरामध्ये येणार्‍या तसेच शहराबाहेर जाणार्‍या नगर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, पैठण, गेवराई, मिरी अशा जवळपास सर्वच हमरस्त्यांची तसेच तालुक्याच्या ग्रामीण परिसरात जाणार्‍या जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सर्वच वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून कित्येकांना खड्डे वाचविताना जायबंदी होण्याची प्रसंग आले आहेत.

त्यामुळे शहर व गावे खड्ड्यात आहेत की, रस्त्यावर खड्डे आहे हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेवून तसेच ज्या रस्त्याचे काम मजूर आहेत. ती कामे तातडीने सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, राजेंद्र नाईक, शेख सलीम जिलानी, विशाल इंगळे, सागर गरूड, आदिनाथ जगधने, चंद्रकांत थोरात, अशोक बिडे, शेख राजू भाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com