
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
भरधाव वेगाने जाणारी कार (Car) पुलावरून प्रवरा नदी पात्रात (Pravara River) कोसळल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द (Sangamner) परिसरात घडली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एम एच 17 सीएम, 5559 या क्रमांकाची कार शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संगमनेर हून खांडगाव कडे जात होती. ही कार संगमनेर खुर्द (Sangamner) परिसरातील प्रवरा नदीच्या (Pravara River) छोट्या पुलावरून जात असताना वाहनचालकाला अंदाज न आल्याने ती पुलावरून कोसळली.
या कारमध्ये (Car) फक्त वाहन चालक होता. कार पुलावरून कोसळल्याने या कारचे मोठे नुकसान झाले. मात्र वाहन चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली.