मुलाने बापास जिवे मारण्याचा प्रयत्न करत घर पेटवून दिले

घरातील सर्व सामान खाक; गुन्हा दाखल
मुलाने बापास जिवे मारण्याचा प्रयत्न करत घर पेटवून दिले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून दारू पिऊन मुलाने शिवीगाळ करत वडिलांना कुकर डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच राहते घर पेटवून दिले. या घरातील सर्व वस्तू खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणखोल याठिकाणी शेरखान नबाबखान पठाण हे आपल्या कुटुंबासमवेत जेवण करुन बसले असता त्यावेळेस त्यांचा मुलगा रईस पठाण हा दारू पिऊन घरात आला व जेवणाच्या कारणावरून शिवीगाळ करत वाद घालत होता. त्यावेळी त्याचे वडील शेरखान हे त्यास समजावून सांगण्यास गेले असता रईस याने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कुकर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी मला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या दरम्यान रईसने आमचे राहते घर पेटवून दिले. या आगीत घरातील सर्व वस्तू खाक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग विझविण्यास परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली.

याप्रकरणी शेरखान बाबरखान पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रईस शेरखान पठाण याचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com