धक्कादायक! बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराजवळील विहीरीत

धक्कादायक! बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराजवळील विहीरीत

जामखेड | तालुका प्रतिनिधी

एक दिवसापासून बेपत्ता असलेल्या जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील मुलाचा मृतदेह घराजवळच विहिरीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फक्राबाद येथील संग्राम संतोष भोसले (वय ६) हा काल (५ फेब्रुवारी) पासुन घरासमोर खेळत असतांना अचानक बेपत्ता झाला होता. या बाबत पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी सदरची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली होती.

दरम्यान, दुसर्‍या दिवशी सकाळी दि ६ रोजी घराजवळील कठाडे नसलेल्या विहीरीत येथील ग्रामस्थ रज्जाक शेख यांना मुलाच्या चपला विहिरी वरील पाण्यात तरंगताना आढळून आल्या. या नंतर संग्राम विहीरीत पडला आसल्याचे लक्षात आले. यानंतर सदर विहीरीत पाणी काढून दोरीच्या सहाय्याने सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ. फुलमाळी हे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com