
वैजापूर | Vaijapur
राहत्या घरामागे असलेल्या हौदमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याची घटना 19 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील शिऊर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह तिच्या सासूस ताब्यात घेतले आहे. माया दादासाहेब आगलावे ( 28 रा. शिऊर ) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिऊर येथील मृत माया आगलावे हीचा मृतदेह राहत्या घरामागे हौदामागे आढळून आली,यावेळी शिऊर पोलिसंना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह टाकीतून बाहेर काढत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला,यावेळी मायाच्या माहेर कडील मंडळींनी उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली.
या घटनेची महीती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत आढाव घेतला. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आलेली असून उत्तरीय तपासणी झाल्या नंतर पोलीस पुढील कारवाई करण्यात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह तिच्या सासूस ताब्यात घेतले आहे.