पुरात वाहून गेलेल्या नागरिकाचा मृतदेह सापडला

तब्बल बारा तासानी सापडला मृतदेह
पुरात वाहून गेलेल्या नागरिकाचा मृतदेह सापडला

सुपा | वार्ताहार | Supa

सोमवारी दुपारनंतर पारनेर तालुक्यातील पारनेरसह हंगा, शहाजापुर, वडनेर, लोणी हवेली, या गावात जोरदार पाऊस झाला. एकप्रकारे ढगफुटी झाली. परिसरातील सर्व पाणी ऐकञीत हंगा येथुनहंगानदीच्या पाञात एकञीत झाले. त्यामुळे हंगा नदीला पुर आला. सोमवारी हंगा नदीला आलेल्या महापुरात मुंगशी येथिल दत्ताञे दिनकर थोरात वय ५२ हे हंगा मुगंशी प्रवासात हंगा नदी ओलाडत होते . त्यावेळी मुंगशीजवळील हंगा नदी पुलाच्या वरुन वहात होती थोरात याना पाण्याचा आंदाज न आल्याने नदीच्या पाञात वाहुन गेले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पीआय रांजेंद्र भोसले आपल्या सहकार्यासह घटनास्थळी आले. परंतु नदीचे रौंद्र रुप व आंधार यामुळे तपासास मर्यादा आल्या. आज सकाळीच गावकर्यानी शोधमोहीम हाती घेतल्यावर पुलापासुन १०० मिटरवर बाभळीच्या झाडात मृतदेह आडकलेला दिसला. सुपा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदणासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com