नगरची कुमुदिनी वाढविणार भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक कुंडाची शोभा

नगरची कुमुदिनी वाढविणार भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक कुंडाची शोभा

जागतिक पातळीवर नोंद घेतलेल्या नगरच्या कुमुदिनीला भुईकोट किल्ल्यात मानाचे स्थान.!

अहमदनगर | Mumbai

भिंगार येथील निसर्गअभ्यासक शिक्षक श्री.जयराम श्रीरंग सातपुते यांनी कृत्रीम परागीभवन प्रक्रियेतुन विकसित केलेल्या "निम्फिया स्काय जय" या कुमुदिनीच्या नवीन प्रजातीला भुईकोट किल्ल्यात मानाचे स्थान दिले गेले आहे.

अमेरिकेतील IWGS अर्थात इटरनॅशनल वाॅटर गार्डनिंग सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेनेही त्यांच्या या प्रजातीला मान्यताही दिलेली आहे.

भुईकोट किल्ल्याच्या विकास कामाच्या वेळी केल्या गेलेल्या उत्खननात अतिशय पुरातन व भव्य दगडी कुंड सापडला होता. हा ऐतिहासिक कुंड भुईकोट किल्ल्याच्या अगदी मध्यभागी मुख्य कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेला आहे.

काही वर्षापासुन हा कुंड रिकामाच होता. अहमदनगर मध्ये जन्मघेतलेली कुमुदिनीची ही नवीन प्रजाती म्हणजे अहमदनगर शहराचा सन्मान आहे असे मत व्यक्त करत लष्करातील सप्लाय डेपोचे मेजर उदयनप्रकाश ठाकुर यांच्या संकल्पनेने या ऐतिहासिक कुंडात "निम्फिया स्काय जय" या नगरच्या कुमुदिनीचे रोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार श्री.उदयनप्रकाश ठाकुर यांच्या हस्ते या कुंडात नुकतेच या कुमुदिनीचे रोपन करण्यात आले. "निम्फिया स्काय जय" ही कुमुदिनी यापुढे या ऐतिहासिक कुंडाची शोभा वाढविणार आहे.

यावेळी संशोधक श्री.जयराम सातपुते यांच्यासह कॅप्टन करन सगवान, स्वीय सहाय्यक सुबेदार श्री. साहब सिंग यादव, माजी सैनिक श्री.श्रीरंग सातपुते, स्वागत अहमदनगरचे अमोल बास्कर, पंकज मेहेर, छायाचित्रकार सुरज कपाळे, कर्मचारी आण्णा बनसोडे,आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com