नेवासा तालुक्यात सरासरी 76.75 मिमी पावसाची नोंद
सार्वमत

नेवासा तालुक्यात सरासरी 76.75 मिमी पावसाची नोंद

नेवासा खुर्द-सलाबतपुर व वडाळा मंडलात ढगफुटी सदृश पाऊस

Nilesh Jadhav

नेवासा | Newasa

नेवासा तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसाची सरासरी 76.75 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पहिल्या वादळी पावसाने ऊस - मका पिके भुईसपाट झाले आहेत.

नेवासा तालुक्यात गुरुवारी रात्री 9 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. तासभर झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील नदी, ओढे-नाले पुन्हा वाहते झाले आहेत.

तालुक्यातील नेवासा खुर्द (120मिमी), वडाळा बहिरोबा (135 मिमी) व सलाबतपुर (126 मिमी) या तीन मंडलात ढगफुटी सदृशय पाऊस झाला. रात्री 10.30 वाजता सुमारे अर्धा तास जोरदार वादळ झाल्याने अनेक गावातील झाडे पडली. उंच वाढीची उभार असलेली ऊस व मका या सारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

नेवासा तालुक्यात 127 महसुली गावे असून या गावासाठी 8 महसूल मंडले आहेत. मंडल निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे.

सोनई (56 मिमी)

नेवासा खुर्द (120 मिमी)

वडाळा बहिरोबा (135 मिमी)

कुकाणे (35मिमी)

घोडेगाव ( 48 मिमी)

सलाबतपुर (126 मिमी)

चांदा ( 76 मिमी)

नेवासा बुद्रुक (18 मिमी)

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा मंडळात सर्वांधिक 135 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुकाणा  मंडलात 35 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस नेवासा बुद्रुक मंडलात 18 मिलीची नोंद झाली आहे. भेंडा बुद्रुक येथे 48 मिमी पावसाची नोंद झाली. 2 महिन्याचे विश्रांती नंतर भेंडा परिसरातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे.

Deshdoot
www.deshdoot.com