लोणी खुर्द येथील ATM अज्ञात चोरट्यांनी फोडले

लोणी खुर्द येथील ATM अज्ञात चोरट्यांनी फोडले

लोणी l वार्ताहर

राहाता (rahata) तालुक्यातील लोणी खुर्द (loni khurd) गावातील वेताळबाबा चौकात असलेले टाटा इंडिकॅश एटीएम (Tata Indicash ATM) अज्ञात चोरट्यांनी रविवार दि.१० रोजी मध्यरात्री २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास फोडून लाखो रुपये चोरून नेले.

लोणी पोलिसांनी (loni police) सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन स.पो.नि.समाधान पाटील यांना तपासासाठी महत्वाच्या सूचना दिल्या.

लोणीत (loni pravara) यापूर्वी आशा घटना घडलेल्या असून तपासात परप्रांतीय गुन्हेगार निष्पन्न झाले होते मात्र त्यांना पोलीस पकडू शकले नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com